महाराष्ट्र

Rohit Patil News: '....तर गाठ माझ्याशी', रोहित पाटलांचा संजयकाका पाटील यांना खणखणीत इशारा

Sangli Politics Rohit Patil On Sanjay Kaka Patil: कवठेमहांकाळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभा घेऊन निषेध नोंदवण्यात आला.

विजय पाटील

सांगली, ता. २८ सप्टेंबर

Rohit Patil Vs Sanjay Kaka Patil: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याप्रकरणी सांगलीत राजकारण तापले आहे. याप्रकरणी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुनच संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय काका पाटील यांच्या या टीकेचा रोहित पाटलांनीही समाचार घेतला आहे.

काय म्हणाले रोहित पाटील?

'विधानसभेपर्यंत काय करायचे ते करून घ्या, विधानसभेनंतर तुम्हाला काही करायला देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना दिला आहे. त्याचबरोबर यापुढे कार्यकर्त्यांच्या घराकडे बघाल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा देखील रोहित पाटलांनी दिला आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये आयोजित निषेध सभेमध्ये ते बोलत होते.

कवठे महांकाळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कवठेमहांकाळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभा घेऊन निषेध नोंदवण्यात आला.

सांगलीचे खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई यांच्यासह तासगाव-कवठेमहांकाळ मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, या मारहाण प्रकरणात रोहित पाटील यांनी घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT