Mla Sumantai Patil, Sangli
Mla Sumantai Patil, Sangli saam tv
महाराष्ट्र

Sangli News : टेंभूच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटील आक्रमक, सांगली प्रशासनास दिला इशारा

विजय पाटील

Sangli News : स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील (mla sumantai patil) या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यल्यासमोर उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे. तासगाव- कवठेमहांकाळ या त्यांच्या विधानसभा मतदार संघात असणाऱ्या टेंभू योजनेतून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याने त्यांनी आंदाेलनाचा मार्ग स्विकारला आहे. (Maharashtra News)

टेंभू व म्हैसाळ उपसा जल सिंचन योजनेतुन सध्या आवर्तन सुरू असून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील भागाला पुरेसे पाणी मिळालेले दिसून येत नाही. आमदार सुमनताई पाटील यांनी स्वतः या दोन्ही योजनेचे पाणी कोणत्या भागात किती पाणी आले हे पाहण्यासाठी दौरा केला.

यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी व तासगाव तालुक्यातील जरंडी, यमगरवाडी, दहिवडी या गावांना पुरेसे पाणी मिळत नाही अशी माहिती त्यांच्यापर्यंत पाेहचली.

सध्या झालेल्या योजनेतून पुरेसे पाणी मिळेल असे, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र ज्यावेळी सिंचन योजनेच्या बंदीस्त पाईप मधून पाणी आले. त्यावेळी ते अतिशय कमी येत आहे. हे पाणी सिंचन योजनेसाठी पुरेसे नसल्याचे लक्षात आले. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावरील शेतकरी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करत होते. आमदार पाटील यांनी या भागात भेट देऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यांनी येत्या चार ते पाच दिवसात पूर्ण क्षमतेने पाणी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी दोन्ही योजनेची सुरू असलेल्या कामाची ही पाहणी करून कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना दिल्या. यावेळी जरंडी, घाटनांद्रे, तिसंगी, यामगरवाडी, दहिवडी, येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

SCROLL FOR NEXT