Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli: बिबट्याचे कातडे, सांबरची शिंगे व 18 किलोचे खवले जप्त; मुद्देमालासह तस्कर जेरबंद

बिबट्याचे कातडे, सांबरची शिंगे व 18 किलोचे खवले जप्त; मुद्देमालासह तस्कर जेरबंद

विजय पाटील

सांगली : मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाणे आणि सांगली वन्य विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईत वन्य प्राण्यांची (Sangli) कातडी आणि अवशेष तस्करी करणाऱ्या इसमाला जेरबंद करून सुमारे 28 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Breaking Marathi News)

मिरज पोस्ट ऑफिसजवळ जकात नाक्यासमोर एक इसम वन्य प्राण्याचे (Forest Department) कातडी तस्करी करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस तसेच सहायक वनपाल युवराज पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. त्या ठिकाणी छापा मारून एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन प्लास्टिक पोत्याची झडती घेतली असता पोत्यामध्ये बिबट्याचे कातडे, सांबरची दोन शिंगे व खवल्या मांजराच्या अंगावरील सुमारे 18 किलो वजनाचे खवल्या आढळून आले.

तस्‍करी करणारा ताब्‍यात

वन्य प्राण्यांची कातडी तस्करी करणाऱ्या अशोक सदाशिव कदम (वय 55 रा. कदमवाडी राधानगरी, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक करून 28 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशोक सदाशिव कदम याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

Maharashtra News Live Updates: येवला तालुक्यातील पाटोदामध्ये भुजबळ-जरांगे पाटील समोरासमोर येणं टळलं

Rahul Gandhi : निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली राहुल गांधी यांची बॅग, काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा

IRCTC वेबसाइटवरून तिकीट बूक होईना? मग 'हे' अ‍ॅप्स घडवतील प्रवास

VIDEO : मविआ ही कोविडच्या काळात मलिदा खाणारी गॅंग; फडणवीस यांची घणाघाती टीका | Marathi News

SCROLL FOR NEXT