Sangli News Saam tv
महाराष्ट्र

पत्नीच्या आजारपणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण ती... पतीनं उचललं टोकाचं पाऊल पाऊल

पत्नीच्या आजारपणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण ती... पतीनं उचललं टोकाचं पाऊल

विजय पाटील

सांगली : पत्नीच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च होऊनही पत्‍नी बरी झाली नाही. आजारपणासाठी झालेला खर्च फेडणे अशक्य झाले आहे. यामुळे नैराश्यातून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Sangli) सांगली जिल्ह्यातील वशी येथे घडली आहे. (Breaking Marathi News)

संजय चौगुले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संजय चौगुले यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघात (Accident) झाला होता. त्यानंतर पत्नीच्या उपचारासाठी संजय चौगुले यांनी कर्ज घेतले. मात्र उपचार करून देखील पत्नीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. दुसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे चौगुले हे चिंतेत होते.

कर्जाचा डोंगर वाढला

एकाबाजुला पत्नीचा आजार ठीक होत नाही. कर्जाचा डोंगर वाढत आहे. यामुळे नैराश्यातून संजय चौगुले (वय 37) यांनी राहत्या घराशेजारी असणाऱ्या शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT