Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : मानाचा नारळ ४१ हजार रुपये, कोथिंबीर जुडी २० हजारात खरेदी; महाप्रसादातील वस्तूंचा लिलाव

Sangli News : ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्यानंतर समारोपाला पुरण- पोळी, दुध, भात असा प्रसाद केला जातो. पुरण पोळीचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येतात

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या लिलावात विक्रीला गेलेल्या वस्तूंच्या दराने सगळे विक्रम मोडीत नवा उच्चांक प्रस्थापित केला. या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला तब्बल वीस हजार रुपये इतका दर मिळाला. तर मानाचा नारळ तब्बल ४१ हजार रुपयांना खरेदी करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्यानंतर समारोपाला पुरण- पोळी, दुध, भात असा प्रसाद केला जातो. पुरण पोळीचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येतात. यंदा तर सुमारे आठ हजार लोकांनी पुरण पोळीचा आस्वाद घेतला. या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या विविध वस्तूंचा लिलाव दुसऱ्या दिवशी मंदिरात होतो. त्यातून मिळालेल्या पैशातून मंदिरात वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

संपूर्ण गाव लिलावात सहभागी 

मंदिरात झालेल्या लिलावात सगळा गाव सहभागी होतो. यंदाच्या लिलावात प्रत्येक वस्तूचा दर शंभर रुपये निश्चीत करण्यात आला होता. मात्र श्रद्धेतून या लिलावात मोठी चढाओढ लागली होती. त्यातून अनेक वस्तूंना मोठ्या रकमेची बोली लागली. लिलावात उत्तम चौगुले यांनी कोथिंबीर जुडी वीस हजारांना घेतली. तर मनाचा नारळ तब्बल ४७ हजार रुपयांना विक्रीला गेला आहे. अर्थात यंदा झालेल्या लिलावात विक्रमी दर मिळाला आहे. 

पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न 

याशिवाय गहू सुरेश आंबी यांनी बारा हजार रुपयांना, तांदूळ शिवाजी हवालदार यांनी तेरा हजार, हरभरा डाळ अविनाश शिंदे यांनी साडेनऊ हजार, चटणी संपत पाटील यांनी १७ हजार रुपये, पडदे विक्रम पाटील यांनी १७०० रुपयांना,  तर मानाचा नारळ खरेदीसाठी मोठी चढाओढ लागली. त्यात गजानन पाटील यांनी बाजी मारत हा नारळ तब्बल ४१ हजार रुपयांना खरेदी केला. या लिलावातून मंदिर समितीला पावणे दोन लाख रुपये मिळाले. हा लिलाव मोठ्या उत्साहात होतो. चढाओढ असली तरी त्यात श्रद्धा अग्रस्थानी असते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT