grapes Farming Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादकांची कोंडी; बदलत्या हवामानाचाही बसतोय फटका

Sangli News : राज्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे चार लाख ५० हजार एकर इतके आहे. यावर्षी द्राक्ष हंगामाला अस्मानी संकटाचा फटका बसला आहे. त्यातही शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा वाचवल्या

विजय पाटील

सांगली : सततच्या अस्मानी संकटाने द्राक्ष उत्पादक शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसापासून (Sangli) वातावरण बदल होत असल्याने द्राक्षांची गोडी, रंग आणि जाडी वाढण्यास अडथळा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीतही राज्यातील द्राक्ष हंगाम सुरू झाला असून आत्तापर्यंत दहा ते पंधरा टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री झाली आहे. मात्र द्राक्षाचे दर दबावात असून द्राक्ष उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे. (Live Marathi News)

राज्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे चार लाख ५० हजार एकर इतके आहे. यावर्षी द्राक्ष हंगामाला अस्मानी संकटाचा फटका बसला आहे. त्यातही शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा (Grapes Farming) वाचवल्या. आगा फळ छाटणी सुमारे ५० हजार एकरावर झाली होती. या आगात फळ छाटणीमधील द्राक्षाची विक्री पूर्ण झाली. द्राक्ष हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना झाला. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून हंगामाला थोडी गती मिळाली.  मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे (Rain) द्राक्षांचे नुकसान झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वातावरण बदलाचा फटका दरही मिळेना 

सध्या उत्तर भारतात थंडी वाढल्याने त्या भागातून द्राक्षाची मागणी कमी झाली असल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात कधी ढगाळ वातावरण तर थंडी याचा फटका बागेला बसत आहे. परिणामी द्राक्षात गोडी उतरली, रंग आकार वाढला नाही. त्यामुळे याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर झाला असल्याचे द्राक्ष उत्तपादक शेतकऱ्यांनी सांगितले. द्राक्ष उत्पादन खर्च वाढत आहे. त्यातच द्राक्षाला तयार करण्यासाठी ३० रुपये इतका खर्च येतो. सध्या द्राक्षाला वीस ते चाळीस रुपये असा दर मिळत आहे. वास्तविक पाहता उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळत असल्याने आर्थिक ताळमेळ कसा लावायचा असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

द्राक्षाचे होणारे फायदे ओळखून राज्य सरकारने इतर प्रॉडक्टचे जसे ब्रँडिंग केले जाते. तसेच शेतकऱ्याच्या द्राक्षाचे ब्रॅण्डिंग करावे. द्राक्षाच महत्व आणि होणारे फायदे जगासमोर आले तर शेतकऱ्याचा एकही द्राक्षाच्या मनी शिल्लक राहणार नाही. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT