Sangli News Krishna River
Sangli News Krishna River Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: मळीमिश्रीत पाण्यामुळे कृष्णा नदीतील मासे मृत; नागरिकांच्या आरोग्यासही धोका

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेटावरील कृष्णा नदीत गेली दोन दिवसांपासून विषारी पाणी नदीमध्ये मिक्स झाले आहे. यामुळे हजारो मासे मरून पाण्यावरती तरंगताना पाहायला मिळाले. (Maharashtra News)

मळीच्या पाण्यामुळे कृष्णा नदीचे (Krishna River) पाणी दूषित झाले असून त्यामुळे माशांना हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे या ठिकाणी गेल्‍या तीन दिवसांपासून मासे मरत असल्याचे स्थानिक नागरिकांतून सांगण्यात आले आहे. तर मेलेल्या माशांपासून व दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या गावामध्ये दुर्गंधी पसरलेली असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तर या कृष्णा नदीचे पाणी तालुक्यातील अनेक गावांना पुरवठा केला जात आहे.

दुषित पाण्याचा बंदोबस्‍त करावा

गेल्‍या तीन दिवसांपासून चाललेली ही माशांच्या मरण्याची श्रृंखला आज सुद्धा सुरुच आहे. आज सुद्धा हजारो मासे पाण्यावरती तरंगत जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर हे पाणी कोणत्या कारखाना किंवा इतर कश्यामुळे दूषित झाले आहे. संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी तपासावे. यावर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकलेंचे ठरले, कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात लढवणार निवडणूक

Today's Marathi News Live : ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली; विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

Sushma Andhare Helicopter Crash News : सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा घडला?

Parenting Tips: मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला घेऊन जाताय? त्यांना आधी शिकवा महत्वाच्या गोष्टी

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT