Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: साखर कारखान्याचे केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी

साखर कारखान्याचे केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नवेखेड सिमेवर असलेल्या फरशी ओढामध्ये साखर कारखान्याकडुन (Sugar Factory) केमिकल मिश्रणीत पाणी पाईपलाईनद्वारे सोडले जात आहे. यामुळे (Sangli News) ओढ्यातील हजारो मासे, जलचर प्राणी मृत्यू पडत आहेत. शिवाय दुर्गंधी देखील पसरली आहे. (Breaking Marathi News)

वाळवा तालुक्‍यातील नामांकित साखर कारखान्याचे केमिकल व मळी मिश्रित पाणी नागठाणे या ओढ्यातून हे केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडत होते. पण नागठाणे गावातील लोकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हे केमिकल व मळी मिश्रण पाणी नवेखेड ओढ्यात पाईपलाईनद्वारे व ट्रँकरने सोडले जात आहे. यामुळे हजारो मासे, जलचर प्राणी मृत पडलेले आहेत. यांच्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

काही करखान्‍यांकडून केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्याचबरोबर जमीन ही नापीक होणार आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गावकऱ्यांनी केला आहे. लवकरात लवकर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT