Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

विजय पाटील

सांगली : भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती ते बरोबर आहे असं अजित पवार (Ajit Pawar) यांना पण आता वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे. सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण आहे; अशी अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Live Marathi News)

सांगली (Sangli) येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राष्ट्रवादीचा (NCP) स्थानिक कार्यकत्‍र्याला काही मिळत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही मिळत नाही; असेही बावनकुळे म्हणाले. भास्कर जाधव यांनी फालतू धंदे करू नये. विरोधकांनी कपटकारण करवून सत्ता मिळवली होती. आत्ता विरोधात म्हणून विरोधकांची भूमिका बजावा; असा निशाणा देखील त्‍यांनी साधला.

आणखी काही नेते ठाकरेंची साथ सोडणार

गजानन किर्तिकरसारखा माणूस पक्ष सोडता; हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचार करण्यासारखे आहे. उध्दव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घरी जाण्याशिवाय पर्याय नाही. उध्दव ठाकरे यांची साथ आणखी काही नेते सोडणार आहेत.

व्हिजन असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

18 तास काम केल्याशिवाय न थकणार नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. राज्याला व्हिजन असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्या काळात 18 तास काम करणारे नेते मिळाले नाहीत. पण आता 18 तास मंत्रालय खचाखच भरलेले असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

Nasim Khan News : कॉंग्रेसचं नाराजीनाट्य शमलं! नसीम खान यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी..

Shriniwas Pawar News : तर अजित पवारांनी आताच मिशी काढावी, बंधू श्रीनिवास यांची प्रतिक्रिया

Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

SCROLL FOR NEXT