Medha Kulkarni Vs Amol Mitkari: Saamtv
महाराष्ट्र

Medha Kulkarni: 'अमोल मिटकरी असतील तर स्टेजवर बसणार नाही', मेधा कुलकर्णींनी सांगितला किस्सा; मिटकरींचाही तात्काळ पलटवार

Medha Kulkarni Vs Amol Mitkari: बारामतीमध्ये एका कार्यक्रमात अमोल मिटकरी यांच्यासोबत स्टेजवर न बसण्याची भूमिका घेतल्याचा किस्सा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगलीतील कार्यक्रमात सांगितला. यावर आता अमोल मिटकरी यांनीही प्रत्यूत्तर दिले आहे.

विजय पाटील

सांगली, ता|१ मार्च २०२४

'आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही असा पवित्रा घेत बारामतीमध्ये एका कार्यक्रमात अमोल मिटकरींसोबत स्टेजवर बसणार नाही,' अशी भूमिका घेतल्याचा किस्सा भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितला. सांगलीमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी बारामतीच्या एका कार्यक्रमातील किस्सा सांगितला. 'आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही अशी भूमिका मी अमोल मिटकरींच्या बाबतीत घेतली होती.

मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले. ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही, असे त्या म्हणाल्या.

देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे मोदी, फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे, असेही मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांचा हा दावा अमोल मिटकरींनी खोडून काढला आहे.

अमोल मिटकरींचा पलटवार!

"मेघाताई बारामती येथील त्या कार्यक्रमाला मी सुद्धा उपस्थित होतो. आपण त्या कार्यक्रमास्थळी अमोल मिटकरी यांच्या अगोदर येऊन बसला होता. तुम्ही स्टेज वर आहात म्हणून अमोल मिटकरी स्वतःच स्टेजवर आले नाहीत. तुम्ही निघून गेल्या व मी स्टेजवर आलो. मग तुमचा स्टेजवर जाणार नाही हा प्रश्न कुठून येतो?" असा सवाल आता मिटकरींनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

Ladki Bahin Yojana: "काहींना लाडकीचा लाभ नाही" , राम कदमांच्या वक्तव्यानं राजकारणात चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update :नांदेडच्या गोदावरी नदीपात्रात उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT