Sangli Robbery at Jewelers Showroom saam tv
महाराष्ट्र

Sangli Robbery News : सांगलीत ज्वेलर्स शॉपवर दरोडा! सशस्त्र दरोडेखोरांची मॅनेजरला मारहाण, ग्राहकावरही गोळीबार

Robbery at Jewelers Showroom : दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या दरम्यान दरोडेखोरांनी दुकानातील सर्वांना बांधून मॅनेजरला मारहाण केल्याचे समजते.

Chandrakant Jagtap

Sangli Robbery at Jewelers Showroom : सशस्त्र दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकून ज्वेलर्सला लुटल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. सांगली-मिरज रोडवर रिलायन्स नावाचे सोने चांदीचे शोरूम या दरोडेखोरांनी लुटले आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या दरम्यान दरोडेखोरांनी दुकानातील सर्वांना बांधून मॅनेजरला मारहाण केल्याचे समजते. तसेच एका ग्राहकावर गोळीबार देखील केल्याची माहिती समोर येत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, सांगली शहरातील सांगली मिरज रोडवर रिलायन्स या सोने चांदीच्या शोरूम वर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. शोरूममधील सर्व सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. यादरम्यान चोरट्यांनी फायरिंग देखील केल्याचे समजते. यामध्ये एक ग्राहक जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात आठ ते दहा जणांनी ग्राहक बनून प्रवेश केला. यानंतर त्यांनी आतील कर्मचाऱ्यांना आपल्याकडील बंदूकीचा धाक दाखवत एका ठिकाणी थांबण्यास सांगितले. यानंतर चोरट्यांनी सर्वांचे हात बांधले आणि दुकानातील सर्व दागिने त्यांच्याकडील बॅगमध्ये भरण्यास सुरुवात केली. (Breaking News)

यावेळी शोरुम मॅनेजरने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्यांनाही मारहाण केली. या सर्व घडामोडीत चोरट्यांनी अवघ्या काही वेळात शोरुममधील सर्व सोन्याचे दागिने लुटले. यावेळी एका ग्राहकांवरही या चोरट्यांनी गोळीबार केल्याचे समजते, या घटनेत ग्राहक जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जाताना दरोडेखोर सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील सोबत घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व विश्राम बाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर या शोरूमसमोर नागरिकांचीनी मोठी गर्दी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियावर 11 लाख फॉलोअर्स; पण मतं फक्त 444! प्रसिद्ध इन्फ्लएन्सरचा दारुण पराभव

Water Cut : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मंगळवारी नळाला पाणी येणार नाही, कोणते भाग प्रभावित?

1 फ्लॅट, 3 पुरूष आणि 1 तरुणी; लातूरमध्ये वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, पोलिसांनी असा रचला सापळा

यालाच देशद्रोही... ज्ञानेश कुमार यांना जेलमध्ये पाठवणार; राहुल गांधी रामलीला मैदानातून गरजले|VIDEO

WhatsApp वापरणाऱ्यांच्या कामाची बातमी, ग्रुप ॲडमिनला मिळणार 4 खास फीचर्स, नेमका फायदा काय?

SCROLL FOR NEXT