Sangli Bajar samiti Saam tv
महाराष्ट्र

Sangli Bajar samiti : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे; हळदीला मिळाला विक्रमी १६ हजाराचा भाव

Sangli News : सांगली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. हळद काढणी झाल्यानंतर अक्षय तृतीयेला बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने सौदे करण्यात येत असतात

Rajesh Sonwane

सांगली : अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात हळदीचे सौदे करण्यात येत असतात. त्यानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. यावेळी हळदीला १५ हजार ५०० ते १५ हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हळद बाजारपेठेमध्ये दाखल झाली होती.

सांगली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. हळद काढणी झाल्यानंतर अक्षय तृतीयेला बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने सौदे करण्यात येत असतात. त्यानुसार सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणली होती. त्यानुसार बाजार समितीमध्ये आज हळदीची सुमारे १४ हजार क्विंटल इतकी आवक झाली होती. तर यंदाचा ९० टक्के सिझन पूर्ण झाला आहे. 

१६ हजार रुपयांपर्यंत मिळाला दर 

आज निघालेल्या मुहूर्ताच्या दरामध्ये मध्यम राजापुरी हळदीला १४ हजार ५०० ते १६ हजार भाव मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणावी; असे आवाहन बाजार समितीकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी खरीदार शेतकऱ्यांना चांगले दर मिळाल्यामुळे शेतकरी खुश आहेत. तसेच मालाची क्वालिटी चांगले आसल्यामुळे मार्केटिंग फास्ट झालेला आहे. 

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पंढरपूरच्या बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आंबे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दरम्यान आंब्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बाजारात स्थानिक गावरान आंब्यासह केशर, मलगोबा, तोता, हापूस अशा विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. दरम्यान यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. केशर आंब्याला चांगली मागणी वाढली आहे. केशर आंबा प्रती किलो १०० ते १५० रूपये दराने विकला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच

Mumbai Rain : गरज असल्यासच घराबाहेर पडा; मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज |VIDEO

Caffeine Skin Effects : कॉफी प्यायल्याने स्कीन खराब होते का?

Car Models: 'या' कार मॉडेल्स डोंगराळ रस्त्यांवरही देतात जबरदस्त परफॉर्मन्स, किंमत स्पोर्ट्स बाईकपेक्षा कमी

Superstition: अंधश्रद्धेचा कळस! तांत्रिकानं खोलीत नेलं अन् शौचालयाचं पाणी पाजून गळा दाबला; बाळासाठी महिलेचा बळी

SCROLL FOR NEXT