Sangli RTO Bribe Case Saam TV
महाराष्ट्र

चोर सोडून संन्याशाला फाशी; लाचखोर RTO अधिकाऱ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणावरतीच गुन्हा

आरटीओ विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केल्यामुळे RTO विभागाच्या या कारभाराविषयी सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात गाडी पासिंगसाठी लाच मागितल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी आपली कपडे काढून अधिकाऱ्याला देत आंदोलन केलं. या आंदोलनाचा व्हिडिओ देखील समाज माध्यमावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

प्रसार माध्यमातून या आंदोलनाच्या बातम्या आल्यानंतर संबधित RTO अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची मागणी होत असताना अधिकाऱ्यांवर कारवाई करण्या ऐवजी आंदोलन करणाऱ्या प्रमोद मांडवे यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरटीओ विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आरटीओ विभागाच्या या कारभाराविषयी सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान. आंदोलनानंतर तक्रार मागे घेण्यासाठी, आपल्याला मॅनेज करण्याचा प्रकार झाला, मी त्या गोष्टीला तयार झालो नाही. त्यामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT