Sangli News Saam tv
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षाची सक्त मजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षाची सक्त मजुरी

विजय पाटील

सांगली : विवाहित असून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू मारुती माडेकर (रा. विजापूर, धुळखेड) याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आले आहे. सांगली (Sangli) न्यायालयातील विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला आहे. (Sangli Today News)

आरोपी विष्णू हा सांगलीच्या आटपाडी (Atpadi) तालुक्यातील एका गावात सालगडी म्हणून काम पाहत होता. पीडित मुलीवर त्याने (Crime) अत्याचार केला. त्यावेळी पीडित मुलगी तेरा वर्षाची होती. भीतीपोटी तिने ही घटना कोणालाही सांगितली नाही. 6 जून 2018 रोजी पीडित मुलीला उलट्या व मळमळ होत असल्याने डॉक्टरांनी तपासणी करून ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. तेव्हा मुलीच्या आईने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

१५ साक्षीदार तपासले

आटपाडी पोलिसांनी आरोपीला अटक करून सर्व पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्यात एकूण 15 साक्षीदार तपासले. पीडित मुलगी व आईचा जबाब आणि वैद्यकीय पुरावा त्याचबरोबर न्याय वैज्ञानिक यांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. अहवालामध्ये पीडित मुलगी आणि आरोपी हेच मुलाचे आई- वडील असल्याचे नमूद होते. साक्षीपुरावे व अहवालानुसार आरोपी विष्णूला दोषी ठरवून दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

Dharmendra : 'घेऊनी टांगा सर्जा निघाला...' धर्मेंद्र यांचं मराठी कनेक्शन, कोणत्या चित्रपटात केले काम?

Teacher Recruitment: कामाची बातमी! राज्यात १८,६०८ शिक्षकांची कंत्राटी भरती; जिल्हा परिषदेच्या शाळेत होणार नियुक्ती

Luckiest zodiac signs: आज कोणाच्या जीवनात येणार शुभवार्ता? पंचांग आणि ग्रहयोग देतायत मोठं संकेत!

SCROLL FOR NEXT