Sangali News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : आई वडिलांसोबत शेतात गेलेली ४ वर्षीय चिमुकली परत आलीच नाही, बंधाऱ्यात सापडला मृतदेह; सांगलीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Sangli News : सांगलीतील डफळापूर येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चार वर्षीय रेणुकाचा मृतदेह बंधाऱ्यात सापडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • डफळापूर येथे चार वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

  • दोन दिवसांपासून चालू असलेला शोध अखेर संपला

  • कुटुंब व गावकऱ्यांवर शोककळा

  • पाणवठ्यांजवळ सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित

सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील डफळापूर येथे बंधाऱ्यात बुडून चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई वडिलांसोबत शेतात गवत काढायला गेलेली चिमुकली दोन दिवसांपासून बेपत्ता होती. मात्र काल म्हणजेच शनिवारी या चिमुकलीचा मृतदेह बंधाऱ्यात आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच चिमुकलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जत तालुक्यातील डफळापूर येथील ३ किलोमीटर अंतरावरील डांगे वस्ती नजीक शेतमजुराची ४ वर्षाची मुलगी रेणुका शिवदास ढोबळे (Renuka Dhoble) ही अचानक गायब झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार,ढोबळे कुटुंब गेले अनेक वर्षे येथे शेतमजुरी करत गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डांगे वस्ती नजीक राहतात. मृत चिमुकलीचे वडील शिवदास ढोबळे यांना तीन मुली आहेत.

गुरुवारी दुपारी बाराच्या दरम्यान शिवदास ढोबळे आणि त्यांची पत्नी गवत काढण्यासाठी शेजारच्या शेतात गेले होते. सोबतच मृत चिमुकली रेणुकाही गेली होती. यादरम्यान रेणुका शेतातून गायब झाली. मुलीच्या अचानक गायब होण्याने आई वडिलांना धक्का बसला. त्यांनी आजूबाजूला शोधा शोध केली असता रेणुका सापडली नाही.

त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. दिवस रात्र एक करून मुलीच्या शोधासाठी पोलीस फोर्स, श्वान पथक, आणि पाणबुडी शोधाशोध करत होते. अखेर काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिमुकलीला शोधण्यात पथकाला यश आले आहे. बंधाऱ्यातील पाण्यात रेणुकाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच चिमुकलीच्या जाण्याने ढोबळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT