Sangli Miraj Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : कर्नाटकमधील तिघा वारकऱ्यांना बेदम मारहाण. मिरज तालुक्यातील मालगावजवळ घटना

Sangli News : बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या सीमाभागातील ३० वारकरी पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी गेले होते. आषाढी वारी करून हे भाविक गुरुवारी ट्रकमधून गावी परत जात होते.

विजय पाटील

सांगली : पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्ताने विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक आता पार्टीच्या मार्गाला लागले आहेत. दरम्यान मिरज ते मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे पंढरपूरहून बेळगावकडे परतणाऱ्या वारकऱ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या तिघांवर मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या सीमाभागातील ३० वारकरी पंढरपूरमध्ये (Ashadhi Wari) आषाढी वारीसाठी गेले होते. आषाढी वारी करून हे भाविक गुरुवारी ट्रकमधून गावी परत जात होते. यावेळी रत्नागिरी- नागपूर महामार्गावरून ट्रक मिरजेकडे (Miraj) जाण्याऐवजी मालगावच्या दिशेने गेला. मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे एक चारचाकी वाहन रस्त्यात उभे केले होते. त्यामुळे ट्रक पुढे जाऊ शकत नव्हता. ट्रकचालक व वारकऱ्यांनी चारचाकी वाहन काढण्याची विनंती वाहन चालकाला केली. त्यातून ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर यांच्यासोबत काही जणांचा वाद झाला. त्यातूनच मनवाडकर यांना जमावाने बेदम मारहाण केली.

मालगावातील एका सराईत गुन्हेगारासह सुमारे वीस जणांच्या जमावाने ट्रक रोखून वारकऱ्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वारकऱ्यांत हलकल्लोळ उडाला. ट्रकमधील वृद्ध व महिला वारकरी, बालके भयभीत झाले होते. ट्रक चालक मनवाडकर यांना कुऱ्हाडीचा दांडा व ट्रकवरील झेंड्याची काठी काढून बेदम मारहाण (Crime News) करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी आलेले वारकरी परशुराम जाधव व तुरमुरीचे ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूरकर यांना देखील जमावाने बेदम मारहाण केली. जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT