Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : पद्मावती मंदिरातील चोरीचा उलगडा; चोरट्यास ताब्यात घेत साडेनऊ लाखांचे दागिने हस्तगत

Sangli News : दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातल्या आरग येथील पद्मावती मंदिरामध्ये चोरी करत देवीच्या अंगावरील दागिने लंपास केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत चोरट्याला अटक

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली होती. पोलिसांकडून याचा तपास सुरु असताना चोरीचा अखेर सांगली पोलिसांनी छडा लावला आहे. चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करत त्याच्याकडून साडे नऊ लाखांचे दागिने हस्तगत केले आहे. याशिवाय पोलिसांकडून त्याची आणखी चौकशी सुरु आहे. 

मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती देवीच्या मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांनी अक्षय मोरे या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातल्या आरग येथील पद्मावती मंदिरामध्ये चोरी करत देवीच्या अंगावरील दागिने लंपास केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत तासगावच्या पाचवा मैल येथून सापळा रचून दागिने घेऊन निघालेला अक्षय मोरे याला ताब्यात घेतले. 

चोरट्याकडून चोरीची कबुली 

पद्मावती मंदिरातून १८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय याची अधिक चौकशी केली असता सदरचे दागिने पद्मावती मंदिरातुन चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून साडेनऊ लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणी आणखी चौकशी सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.

पोलीस ठाण्यातून पळ काढणाऱ्या चोरट्याला पाठलाग करत जेरबंद
पुणे, पिंपरी- चिंचवड येथील बजाज चेतक साई सर्व्हिस प्रा.लि. चिंचवड या इलेक्ट्रीक दुचाकी शोरुममध्ये पीडीआय टेक्निशियन म्हणून काम करणारा आकाश गौतम कांबळे (शिंदेवाडी, ता. मिरज) याने शोरुममधील ५ लाख रुपये रोख रक्कम चोरी करून फरार झाला होता. त्याला मिरज शहर पोलिसांना जेरबंद केले आहे. पण मिरज शहर ठाण्यामध्ये त्याला आणले असता तिथूनही पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. या चोरट्याचा पोलीस पाठलाग करून पकडल्याचे सी सी टिव्ही मध्ये कैद झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

SCROLL FOR NEXT