सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार
मिरज प्रभाग क्रमांक ७ मध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड
मतदाराच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे आढळले
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. या मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. कुठे बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, तर कुठे बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाण्याच्या प्रकारामुळे मतदान केंद्रावर गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. विधानसभेप्रमाणे महापालिकेतही यावेळीही बोगस मतदारांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. सांगली मिरजेतील प्रभाग क्रमांक ७मध्ये बोगस मतदारामुळे बॅलेट पेपरवर मतदान करण्यात आले.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीच्या नावावर दुसराच कोणीतरी मतदार मतदान करू गेल्याची बाब उघडकीस आल्यानंतर येथे बॅलेट पेपरनं मतदान घेण्यात आलं. मिरजेतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये एका व्यक्तीच्या नावावर बोगस मतदान झालं होतं. हा प्रकार तेव्हा उघकीस आला जेव्हा खरा मतदार मतदान करण्यास केंद्रावर आला. खरा मतदार त्याच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी त्याला बॅलेट पेपरवर मतदान करण्याची संधी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ७ मधील मतदान केंद्र क्रमांक २२ येथे मोहम्मद निसार मुल्ला हे मतदान करण्यासाठी गेले होते. परंतु ते मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांना यापूर्वीच त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी संबंधित केंद्रप्रमुखाकडे याबाबत तक्रार केली. त्यामुळे तो मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी त्याला बॅलेट पेपरवर मतदान करण्याची संधी देण्यात आली. महापालिका निवडणुकीतील हा पहिलाच प्रकार समोर आला.
अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं गायब झाल्यानं गोंधळ उडला होता. उल्हासनगरमध्येही मतदार यादीतून नावं गायब झाल्यानं भाजप ठाकरेसेनेत राडा झाला. येथील प्रभाग क्रमांक ३मधेय ही घटना उघडकीस आली.
जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपामुळे आज गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक पाचमध्ये सकाळपासून संशयास्पद मतदार आल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी ॲड. पियुष पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार ४० ते ४५ मतदारांकडून ओळखपत्र आणि आवश्यक पुरावे मागवण्यात आले. मात्र, ते सादर न होऊ शकल्याने संबंधितांना मतदान करू देण्यात आले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.