SANGLI MUNICIPAL CONTRACT WORKERS TO BE MADE PERMANENT; SHINDE ANNOUNCES BIG DECISION saam tv
महाराष्ट्र

या महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी होणार पर्मनंट; फक्त १ अट, आदेश निघाले, लवकरच नियुक्तीपत्र मिळणार

Sangli Miraj Kupwad Municipal Contract Workers Permanent News: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील १० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. लवकरच नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होणार.

Omkar Sonawane

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दहा वर्षाहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे असे निर्देश आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. यासंदर्भात सरकारने नियमानुसार ही पदे भरण्याचे निर्देश त्यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना दिले.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये एकूण ११९८ कर्मचारी सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. यावेळी. या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, नगरविकास अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज, सांगली कुपवाड मनपाच्या आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड मनपामधील या ११९८ कर्मचाऱ्यापैकी काही कर्मचारी मानधनावर तर काही रोजंदारीवर काम करत आहेत. यातील काही कर्मचारी हे २५ ते ३० वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना आता पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुहास बाबर यांनी केली होती.

सद्यस्थितीत पालिकेचा आस्थापना खर्च हा एकूण उत्पन्नाच्या ६५.६ टक्के एवढा आहे. अशात या सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यास पालिकेवर दरमहा अतिरिक्त १० कोटी ४० लाखांचा बोजा पडेल. त्यामुळे सर्वांना सामावून घेतल्यास पालिकेवर पडणारा बोजा टाळण्यासाठी सध्या १० वर्षाहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूर्तास पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत नंतर निर्णय घ्यावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तसेच पालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, मालमत्ता कर वसूल करावा, त्यात नवीन मालमत्तांचा समावेश करावा असे उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. पालिका प्रशासनाकडून उत्पन्न वाढीचे प्रयत्न चालू असून त्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. त्यातून आगामी काळात पालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न जमा होईल असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT