sangli lockdown 
महाराष्ट्र

सांगलीकरांनाे! घरा बाहेर पडू नका; पाेलिसांचे आहे लक्ष

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून (बुधवार, ता. 14) 19 जूलैपर्यंत सांगलीत लाॅकडाउनचे sangli lockdown आणखी कडक नियम केले आहेत. त्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. आज सकाळपासून सांगलीची बाजारपेठ बंद असून या निर्णयाबाबत व्यापारी मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. (sangli-lockdown-restriction-implementation-begins-traders-marathi-news)

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगलीतील निर्बंध आणखी कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला करत रस्त्याच्याकडेला खाद्यपदार्थ विक्री आणि आठवड्या बाजारावर देखील बंदी घातली आहे.

सांगली जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपर्यंत (ता. 13) 948 नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले. याबराेबरच म्युकर मायकोसीसचे आत्तापर्यंत एकूण 314 रुग्ण आहेत. त्यात दाेनची नव्याने भर पडली. जिल्ह्यात मंगळवारी (ता. 13) 12 काेविड बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 4307 पर्यंत गेली असून एकूण 10 हजार 100 रुग्ण उपचार घेताहेत. मंगळवारी रात्रीपर्यंत उपचार घेणारे 950 जण बरे हाेऊन घरी परतल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी 19 जुलैपर्यंत जिल्ह्यात चौथ्या स्तराचे लागू असलेल्या निर्बंधांची कडक  अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिका आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

आज बुधवार सकाळपासून त्याची अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. एरव्ही थाेडी फार वर्दळ असलेल्या शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट आहे. पहाटेच्या वेळीस आणि सकाळ व्यायामासाठी तसेच चालण्यासाठी जाणा-या युवकांची पाेलिसांनी धरपकड केली. सर्व युवकांना एकत्रित आणून पाच दिवस कडक निर्बंध लागू केल्याचे सांगत नियमांचा भंग केल्यास कारवाई करु अशी सक्त ताकीद दिली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक (सांगली शहर) गजानन कांबळे यांनी अनावश्यक कारणासाठी नागरिकांनी घरा बाहेर येऊ नये असे आवाहन केेले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT