Sangli News
Sangli News  Saam TV
महाराष्ट्र

अंधश्रद्धेचा कळस! नवस फेडण्यासाठी लहानग्यांच्या जिवांशी खेळ; मंदिरावरुन मुले झेलण्याची परंपरा सुरुच

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील (Atpadi Taluka) मासाळवाडी येथे मंदिरावरुन मुले खाली सोडायची आणि झेलायची प्रथा आजही सुरू आहे. महालिंगराया देवाच्या यात्रेत, नवस फेडायच्या भावनेतून मंदिरावरुन पुजारी मुले खाली सोडतो आणि खाली घोंगडीत वरुन सोडलेली मुले पकडली जातात. (Sangli)

मंदिरच्या छतावर पुजारी बसलेला उभा असतो. तो त्या लहान मुलांचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात हे पकडतो. या मुलाला खाली घोंगडी धरून उभं असलेल्या लोकांकडे फेकतो. खाली त्या मुलाला झेलण्यासाठी चार लोक घोंगडी धरून लोकं उभे असतात. मात्र, अपघाताने त्या लहानग्यांचा जीव जाऊ शकतो याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.

पाहा व्हिडीओ -

अशा पद्धतीने लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार निश्चितच अंगावर शहारे उभा करणारा आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावा खाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, लहान मुलांना मंदिरावरून फेकणे ही अघोरी अंधश्रद्धा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी श्यामवर्धन यांच्या पुढाकारांमध्ये सांगली जिल्ह्यातील मंदिरावरून मुले फेकणे परंपरा बंद करून त्यांना आळा घातला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाने यावर पावले उचलून कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Today's Marathi News Live: आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT