Sangli ATM Theft News विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli Crime News: एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्याच्या काही तासातच आवळल्या मुसक्या

Sangli ATM Theft News: गुन्ह्यात वापरलेली एक लहान लोखंडी पहार जप्त करण्यात आली आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: सांगलीच्या कुपवाड येथील उल्हासनगर बाजारपेठेतील एका बँकेचे एटीएम मशीन (ATM Machine) फोडून रोकड लांबविणाच्या प्रयत्न करणाऱ्या एकाला कुपवाड पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. अनिकेत गणेश व्हनकडे वय १९, राहणार कुपवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक लहान लोखंडी पहार जप्त करण्यात आली आहे, तर आरोपीने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबुली दिली आहे. (Sangli ATM Crime News)

हे देखील पाहा -

कुपवाड (Sangli) परिसरातील उल्हासनगर दुय्यम निबंधक कार्यालयाखालील एका गळ्यामध्ये युनियन बँकेच्या सांगली शाखेची एटीएम मशीन आहे. शुक्रवारी रात्री एक ते शनिवारी सकाळी आठ वेळेमध्ये संशयित अनिकेत व्हनकडे याने लहान लोखंडी पहारीसह एटीएम मशीन गाळ्यामध्ये प्रवेश केला. आतमधील रोकड लांबवण्याच्या उद्देशाने त्याने मशीनवर पहारीचे घाव घातले. यामध्ये मशीनच्या बाह्यबाजूची आणि स्क्रीनची तोडफोड झाली. अथक प्रयत्न करूनही आतमधील रोकड प्राप्त करण्यास त्याला यश आले नाही. अखेर आपले प्रयत्न थांबवून त्याने घटनास्थळाहून पळ काढला. शनिवारी सकाळी मशिनच्या तोडफोडीचा प्रकार उघड झाला. नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी वस्तुस्थितीची पाहणी केली. माहिती मिळताच बँक अधिकाऱ्यांनीही धाव घेतली.

मशीनची स्थिती पाहता आतील असणारी रोकड सुरक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराची फिर्याद कुपवाड पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासातच संशयिताचा छडा लावला. हनुमाननगर परिसरातील राहत्या घरातून व्हनकडे यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरलेली एक लहान लोखंडी पहारही त्याच्याकडून जप्त करण्यात आली.

युनियन बँक शाखा सांगलीचे मुख्य व्यवस्थापक घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएम मशीनमध्ये १३ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित आहे. मशीनमधील अंतर्गत यंत्रणा मजबूत असल्याने रकमेचा बचाव झाला. वरचेवर झालेल्या तोडफोडीत एटीएम मशीनच्या बाह्य बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train Accident : विरारमध्ये भीषण रेल्वे अपघात! ट्रेनच्या धडकेमुळे ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

किती पोरांसोबत झोपलीस, रांxxx आहेस की... कोथरूड पोलिसांवर तरूणींच्या छळाचा आरोप

Second Shravan Somwar 2025: दुसऱ्या श्रावणी सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

IBPS Jobs : सरकारी नोकरीची संधी, तब्बल १० हजार जागांसाठी मेगाभरती! पगार वाचून थक्क व्हाल!

Maharashtra Live News Update : गर्दी झाली नाही म्हणून मंत्री चिडल्या, कानाखाली मारण्याची भाषा – रोहित पवारांचा संताप

SCROLL FOR NEXT