Sangli Ishwarpur Septic Tank Tragedy Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना, ३ कामगारांचा मृत्यू; ५ जणांची प्रकृती गंभीर

Sangli Ishwarpur Septic Tank Tragedy : सांगलीत एका कंपनीत सेप्टिक टँक साफ करताना ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाने कामगारवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Alisha Khedekar

  • सांगलीत कंपनीच्या सेप्टिक टॅंकमध्ये ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू

  • बचावासाठी उतरलेले ५ जण गंभीर; रुग्णालयात उपचार सुरू

  • बचाव मोहिमेतील जखमी २ जणांना कोल्हापूर येथे हलवले

  • घटनेने कामगार वर्गात भीती आणि परिसरात शोकाचे वातावरण

विजय पाटील, सांगली

सांगली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. एका कंपनीच्या सेप्टिक टॅंकमध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अडकलेल्या तिघांना वाचवायला गेलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. प्रकृती गंभीर असलेल्या पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये पेठ येतील गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या सेप्टिक टॅंक साफ करण्याचे काम सुरू होते. यावेळी टॅंक मध्ये उतरलेल्या तिघा कामगारांचा ऑक्सिजन न मिळाल्याने गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला पाच जणांची प्रकृती ही बिघडली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सेप्टिक टॅंक साफ करण्यासाठी सुरुवातीला सुभाष जाधव टॅंक मध्ये उतरले होते. मात्र टॅंक मधील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर येऊन ते आतच पडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन तानाजी जाधव हे टॅंक मध्ये उतरले मात्र त्यांनाही गुदमरल्याने त्रास होऊन ते जागेवर बेशुद्ध पडले. त्यानंतर कंपनीतील कामगार रंगराव माळी यांनी मदतीसाठी धाव घेतली. ते टॅगमध्ये उतरल्यावर तेही अडकले.

या तिघांनाही तातडीने उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले कामगारांच्याकडून परंतु यामध्ये दोन कामगिरी जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Red Flags: प्रेमात 'हे' रेड फ्लॅग्स दिसले तर लगेच थांबा

Banana Leaf : केळीच्या पानावर जेवण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Thalapathy Vijay Falls Down: थलापती विजयचा विमानतळावर अपघात; चाहत्यांच्या गर्दीमुळे जखमी, VIDEO व्हायरल

Rohit Pawar : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, यामागचं कारण काय? रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Maharashtra Live News Update: वसई विरार पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या गोठ्यात नाराजीचा सुर

SCROLL FOR NEXT