Sangli Goat Cost विजय पाटील
महाराष्ट्र

अबब! माडग्याळमधील एका मेंढीची किंमत ऐकून थक्क व्हाल

शेतकऱ्याच्या अशा तब्बल 6 मेंढ्या विकल्या गेल्या आहेत.

विजय पाटील

सांगली - एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखाहून अधिक मिळू शकते हे कुणालाही पटणार नाही. पण सांगलीच्या (Sangli) माडग्याळ बझारात एक मेंढी दोन लाख 33 हजाराला विकली गेली आहे. शेतकऱ्याच्या अशा तब्बल 6 मेंढ्या विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्याने या मेंढ्यांची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढत आनंद साजरा केला. जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याची (Farmer) सहा मेंढ्यांची तब्बल 14 लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे. (Sangli Latest News)

हे देखील पहा -

मेंढ्याना लाखो रुपयात भाव मिळाल्याने या मेंढ्यांची गावात मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ मधील मेंढीचे विशिष्ट चव आणि स्वाद असलेले मांस प्रसिद्ध आहे. त्यामुळे माडग्याळच्या मेंढीचे दर वाढले आहेत. माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव या मेंढी मिळवून देत आहेत. तर माडग्याळचा बझार प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मेंढी विक्रीस येत आहेत आणि विक्री देखील होत आहे. त्यामुळे या मेंढ्यांची मागणी देखील चांगलीच वाढू लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT