sangli , sangli ganeshotsav  saam tv
महाराष्ट्र

Sangli Ganeshotsav : सांगलीतील गणपती संस्थानच्या उत्सवास दाेनशे वर्ष पुर्ण; शाही सोहळा संपन्न

गणेशाेत्सवा निमित्त पुढील पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजनचे करण्यात आले आहे.

विजय पाटील

Sangli Ganpati Sansthan : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर आज राज्यभरात वाजत गाजत गणपती बाप्पांना घराे घरी तसेच सार्वजनिक गणेशाेत्सव (Ganesh Utsav) मंडळात आणलं जात आहे. काेराेनाचे संकट काहीशा प्रमाणात दूर झाल्याने गणेशभक्त आनंदित आहेत. राज्यभरात गणपती बनविल्या जाणा-या कार्यशाळेतून, कारखान्यातून, दुकानातून गणरायांचा जयघाेष करीत बाप्पांना घरी नेलं जात आहे. दरम्यान सांगली येथील गणपती संस्थानच्या शाही गणेशोत्सव सोहळ्याला आजपासून सुरवात झाली.

श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी गणपतीची दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील पाच दिवस गणपती संस्थांनाचा सोहळा सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या संस्थान गणपतीला यंदा 200 वर्षे पूर्ण होत आहेत.

आज सकाळी शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे वाजत गाजत दरबार हॉलमध्ये आगमन झाले. यावेळी सांगली संस्थांनाचे राजे श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यांनी आपल्या सरकारी गणरायाचे स्वागत केले. त्यानंतर दरबार हॉलमध्ये सरकार गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत पूजाही करण्यात आली.

यावेळी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रीची आरती करण्यात आली. यावेळी राणीसाहेब, संस्थांनाचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्यासह सांगलीतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे सांगली संस्थानच्या गणेशोत्सवास यंदा 200 वर्षे पूर्ण होत असून लोकमान्य टिळकांच्या उत्सवाच्या अगोदरपासून सांगली संस्थानचा गणेशोत्सव सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT