Atpadi Police Station
Atpadi Police Station  SaamTvNews
महाराष्ट्र

Sangli : राजेवाडीत शेतीच्या बांधावरून तुंबळ हाणामारी!

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे शेतीच्या बांधावरून दोघा शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ (Video) कॅमेरात कैद झाला आहे. तर, आटपाडी (Atpadi) पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे देखील पहा :

राजेवाडी (Rajewadi) मध्ये धोंडीराम शिरकांडे यांची 40 एकर जमीन आहे. त्यांच्याच बाजूला संदीप शिरकांडे यांची जमीन आहे. या दोघांमध्ये शेतीच्या बांधावरून अनेक वर्षांपासून वाद आहे. 2001 मध्ये न्यायालयात दावा देखील दाखल आहे. 4 मार्चला स्वप्नील शिरकांडे आणि मचिंद्र शिरकांडे हे जमिनीचा बांध फोडत असताना धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे समजावून सांगत होते. पण या बांधावरून सहा जणांनी धोंडीराम शिरकांडे आणि बाळासाहेब शिरकांडे यांना मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडीओ धोंडीराम यांच्या मुलाने कॅमेरात कैद केला आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस (Atpadi Police) स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील शिरकांडे, मचिंद्र शिरकांडे, बाबुराव जगताप, महादेव जगताप, प्रशांत जगताप, दादासाहेब जगताप, अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. अधिक तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

Parenting Tips: मुलांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवायच आहे? तर या गोष्टी नक्की शिकवा

SCROLL FOR NEXT