sangli dcc bank saam tv
महाराष्ट्र

सहकार क्षेत्रात खळबळ; Sangli DCC बँकेच्या CEO नं दिला तडकाफडकी राजीनामा

सीईओंच्या राजीनाम्यामुळे सांगली जिल्ह्यात चर्चे उधाण आले आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (dcc bank) मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील (jaywant kadu patil resigns) यांनी आज (बुधवार) तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा (resignation) दिल्याने बॅंकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (sangli dcc bank latest news)

जिल्ह्यातील बड्या नेत्याची बँकेतुन एकरकमी कर्ज फेडयोजना, व्याजमाफीचा निर्णय होण्याच्या शक्यता असतानाच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राजीनामा दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जाताहेत.

जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या संस्थाच्या कर्जाचे सुमारे ११० कोटी रूपये व्याज माफ करण्याबराेबरच नेत्याच्या संस्थांचे ७६ कोटी रुपये कर्ज (loan) राईट ऑफ करण्याचा निर्णय ही घेण्यात येणार असल्याची खात्रीशिर माहिती साम टीव्हीकडे उपलब्ध झाली आहे. बॅंकेतील संचालक मंडळात दाेन गट पडले आहेत. एका गटास कडू-पाटील नकाे असल्याने मधल्या काळात ब-याच घडामाेडी हाेऊन गेल्या. त्यातून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान कडू-पाटील यांच्या संपर्क साधला साधता असता त्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तास दुजाेरा देत अधिक काही बाेलले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT