Sangli: 1 हजाराची लाच घेणे पडले महागात! आष्ट्यातील नायब तहसीलदार, लिपिक एसीबीच्या जाळ्यात Saam Tv
महाराष्ट्र

Sangli: 1 हजाराची लाच घेणे पडले महागात! आष्ट्यातील नायब तहसीलदार, लिपिक एसीबीच्या जाळ्यात

सातबारा उताऱ्यावर नावामध्ये बदल करण्याकरिता १ हजार रुपयाची लाच घेताना आष्टा येथील अतिरिक्त तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि लिपिकास रंगेहात पकडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली: सातबारा उताऱ्यावर नावामध्ये बदल करण्याकरिता १ हजार रुपयाची लाच (Bribe) घेताना आष्टा येथील अतिरिक्त तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि लिपिकास रंगेहात पकडले आहे. सांगलीच्या (Sangli) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करण्यात आली आहे. नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील (वय- ५२) रा अशोकराज निवास, ता शिराळा, जि. सांगली आणि लिपिक सुधीर दीपक तमायचे (वय- ३७) रा शांतीनगर, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर अशी या दोघांची नावे आहेत. (Sangli Deputy Tehsildar Clerk of Ashta in ACB net)

हे देखील पहा-

एसीबीच्या (ACB) या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोटखिंडी ता. वाळवा येथील एका शेतकऱ्याने (farmer) सातबारा उताऱ्यावर नावात बदल करून मिळण्याविषयी अप्पर तहसीलदार कार्यालय आष्टा (Ashta) यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता. नावामध्ये बदल करून देण्याच्या कामांमध्ये प्रकरण सही करून तहसीलदार यांच्याकडे पाठवण्याकरिता नायब तहसीलदार बाजीराव पाटील आणि लिपिक सुधीर तमायचे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे १ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

याविषयी संबंधित शेतकऱ्याने सांगली लाचलुचपत विभागाकडे (Bribery department) तक्रार देण्यात आली होती. दरम्यान आज, सकाळच्या दरम्यान संबंधित शेतकरी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी नायब तहसीलदार बाजीराव पाटील आणि लिपिक सुधीर तमायचे याच्याकडे गेले तोटे. त्यांनी त्यांना १ हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम स्विकारताना या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT