LPG Price Hike: घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता

जगभरामध्ये गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम आता भारत देशामध्ये एप्रिलमध्ये दिसून येणार आहे.
LPG Price Hike: घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता
LPG Price Hike: घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यताSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: जगभरामध्ये गॅसची (gas) मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम आता भारत देशामध्ये एप्रिलमध्ये दिसून येणार आहे. यामुळे देशात गॅसच्या किमतीमध्ये दुपटीने वाढू शकणार आहे. यामुळे सीएनजी (CNG), पीएनजी (PNG) आणि विजेच्या किमती वाढणार आहेत. याबरोबरच सरकारच्या (government) खत अनुदानाच्या बिलामध्ये देखील वाढ होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या (Corona) कहर मधून बाहेर येत आहे आणि त्याबरोबरच ऊर्जेची मागणी देखील वाढत आहे. परंतु, २०२१ मध्ये त्याचा पुरवठा वाढवण्याकरिता पुरेशी पावले उचलली गेली नाहीत. (Domestic gas will become more expensive)

हे देखील पहा-

या कारणाने गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आयातित एलएनजी (LNG) करिता घरगुती उद्योग अगोदरच जास्त किंमत देत आहेत. हे दीर्घकालीन करारांमुळे आहे जेथे किंमत कच्च्या तेलाशी जोडली जात आहेत. अनेक महिन्यांपासून भाव भडकत असलेल्या स्पॉट मार्केट (Market) मधून त्यांनी खरेदी कमी केली आहे. एप्रिलमध्ये घरगुती गॅसची किंमत वाढू शकणार आहे. पण त्याचा परिणाम एप्रिलमध्ये दिसून येणार आहे. जेव्हा सरकार नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किमतीत बदल करणार आहे.

उद्योग तज्ञ आणि विश्लेषक म्हणतात की ते $२.९ प्रति एमएमबीटीयू वरून $६-७ पर्यंत वाढवले ​​जाणार असल्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) म्हणण्यानुसार, खोल समुद्रातून बाहेर पडणाऱ्या गॅसची किंमत $६.१३ वरून सुमारे $१० पर्यंत वाढणार आहे. कंपनीमध्ये पुढील महिन्यात काही गॅसचा लिलाव करणार आहे. याकरिता, त्याने कच्च्या तेलाच्या फ्लोअर प्राइसशी जोडले आहे. जी सध्या $१४ प्रति एमएमबीटीयू आहे.

LPG Price Hike: घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता
Pune News: पुण्यात ओबीसी आरक्षण मोर्चात हाणामारी, काँग्रेसने आयोजित केलेला हल्लाबोल मोर्चा...(पहा Video)

देशात घरगुती नैसर्गिक वायूच्या किमती दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर मध्ये निश्चित केले जाणार आहे. एप्रिलची किंमत जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या आंतरराष्ट्रीय (International) किमतींवर आधारित असणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक एके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत एक डॉलरच्या वाढीमुळे सीएनजीच्या किमतीत ४.५ रुपये प्रति किलोने वाढ होणार आहे. म्हणजेच सीएनजीच्या दरात किलोमागे १५ रुपयांनी वाढ होऊ शकणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com