mansingrao naik and jayshree patil 
महाराष्ट्र

सांगली DCC च्या अध्यक्षपदी आमदार नाईक; जयश्री पाटील उपाध्यक्ष

नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक आणि उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड झाली. श्रीमती पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पहिल्यांदाच महिला संचालकास पदाधिकारी हाेण्याचा बहुमान मिळाला आहे. या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. sangli district cooperative bank election result 2021

सांगली जिल्हा बँकेसाठी २१ नोव्हेंबरला मतदान झाले हाेते. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीच्या सहकार पॅनेलने १७ जागा मिळवित बॅंकेत सत्ता स्थापन केली हाेती. या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलला ४ जागांवर समाधान मानावे लागले हाेते.         

महाआघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत सर्वांना उत्सुकता लागूल राहिली होती. अध्यक्षपदासाठी आमदार मानसिंगराव नाईक हेच प्रबळ दावेदावर समजले जात हाेते तसेच उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या जयश्री पाटील यांचे नाव चर्चेत होते. या दाेघांची नूतन पदाधिकारी म्हणून आज बिनविराेध निवड झाली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT