Sangli Crime Saamtv
महाराष्ट्र

Sangli Crime News: राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येचा २४ तासात उलघडा! धक्कादायक कारण समोर; चौघांना अटक

Sangli News NCP Activist Death Update: या घटनेने सांगली शहरासह सपूर्ण जिल्हा हादरला होता. आता या खूनाचे कारण समोर आले आहे.

विजय पाटील

Sangli Crime News: काल रात्री सांगली शहरात भयंकर हत्येची घटना घडली होती. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही निर्घृण हत्या का केली असावी याबाबत पोलिस तपास करत होते. ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून खुनातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामधील 1 आरोपी अल्पवयीन असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Crime News In Marathi)

घरासमोर झाली होती हत्या...

सांगली (Sangli) शहरात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या कार्यकर्त्याची काल (दि. १७ जून) रोजी तब्बल आठ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने सांगली शहरासह सपूर्ण जिल्हा हादरला होता. आता या खूनाचे कारण समोर आले असून ४ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशाल कोळपे (वय २०), स्वप्नील मलमे (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत.

धक्कादायक कारण समोर...

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार , सचिन डोंगरे हे नाव समोर आले आहे. सध्या सचिन डोंगरे हा मोक्का कायद्याअंतर्गत जेलमध्ये आहे. या जेलमध्ये असलेल्या गुन्हेगाराला जामीन न होऊ देण्यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

चौघांनी केली हत्या...

या चौघांनी शुक्रवारी नालसाब रहात असलेल्या ठिकाणची रेकी केली होती. तसेच मुल्ला याच्या हालचालीची माहिती घेतली होती. यानंतर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास या चौघांनी मुल्ला यांच्यावर गोळीबार करीत कोयत्याने हल्ला चढवत तिथून पलायन केले.

घटनेनंतर तातडीने पोलीस अधीक्षक बसवराज तेली उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यानी तीन पथक द्वारे तपास सुरू केला. यामध्ये आज सकाळी या हल्लेखोरांना पकडण्यात यश आले. या चौघांनी नालसाब मुल्ला यांच्या खुनाची कबुली दिली असून सचिन डोंगरे याच्या सांगण्यावरूनच खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT