Sangli Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Sangli Crime News: धक्कादायक! प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचा खून, सांगलीतील घटनेने खळबळ

Sangli Crime News: प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यात मुलाच्या वडिलांचा मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगले येथे घडली आहे.

Sandeep Gawade

Sangli Crime News

प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यात मुलाच्या वडिलांचा मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगले येथे घडली आहे. या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने आणि संबंधित मुलीने पळून जाऊन लग्न केलं होतं. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी पोहोचले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत खांबाला बांधून बेदम मारहाण केली. यात दादासाहेब चौगुले बेशुद्ध पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT