Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा; १६ लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज

Sangli News : रात्रीच्या अंधारात एटीएम मशीन फोडून रक्कम लांबविली जाते. बऱ्याचदा थेट एटीएम मशीनच उचलून नेले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथे घडला

विजय पाटील

सांगली : चोरट्यांकडून बँक एटीएम लक्ष केले जात असून रात्रीच्या सुमारास एटीएम मधील रक्कम लांबविली जात आहे. अशाच प्रकारे सांगलीच्या बुधगाव येथे एसबीआय बँकेच्या एटीएमवर रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात चोरट्यांनी तब्बल १५ ते १६ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

बँक एटीएम असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसते. याचा फायदा चोरटे घेत असून रात्रीच्या अंधारात एटीएम मशीन मशीन फोडून त्यातील रक्कम लांबविली जाते. बऱ्याचदा तर थेट एटीएम मशीनच उचलून नेले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून थेट एटीएम मशीनमधील रक्कम लांबविली आहे.

दोन दिवसांपूर्वीच एटीएम मशीनमध्ये भरणा 

मध्यरात्रीच्या सुमारास एसबीआय बँकेचे एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आले. त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी एटीएम मशीनमध्ये एसबीआय बँकेकडून वीस लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. त्यामुळे त्यात सुमारे १५ ते १६ लाखांची रोकड एटीएममध्ये असण्याची शक्यता पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान हा प्रकार आज सकाळी गावातील नागरिकांच्या लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT