Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

Sangli News : दोघांनी घरात प्रवेश करत बंदूक लागून दागिन्यांची मागणी केली. या प्रकारामुळे घरातील महिलेने आरडाओरड सुरु केल्याने चोरटयांनी घरातून पळ काढला, यामुळे पुढील अनर्थ टाळला आहे

विजय पाटील

सांगली : रात्रीच्या सुमारास भरवस्तीत चोरट्यानी हैदोस घातला होता. घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असून या थरारक घटनेत नागरिकांनी पाठलाग करत पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडून बेदम चोप दिला. यानंतर पोलिसांना माहिती देत चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सांगली शहरात रात्रीच्या सुमारास हि थरारक घटना घडली आहे. चोरट्यानी एका बंगल्यामध्ये धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला आहे. शहरातल्या कॉलेज कॉर्नर जवळ असणाऱ्या रतनशीनगर नजीक हा प्रकार घडला आहे. दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दिवेश शहा यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करत शहा यांना रिव्हॉल्वरची धाक दाखवत दागिने व पैश्याची मागणी केली. यामुळे शहा हे घाबरून गेले होते. 

आरडाओरड केल्याने चोरट्यानी काढला पळ 

दरम्यान चोरट्यानी शहा यांच्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवली होती. हा प्रकार सुरू असताना शहा यांच्या पत्नीकडून घराच्या मागील दरवाज्यातून आरडा-ओरडा करण्यात आला. हे पाहून चोरट्यांनी बंगल्यातून पळ काढला. मात्र आरडाओरडा झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर नागरिकांनी बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. यावेळी घरातून चोरटे पडून जाताना दिसून आले.  

चोरट्यांना पकडून बेदम चोप 

दरम्यान आवाजाने जमा झालेल्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी चोरट्यांकडुन नागरिकांवर रिव्हॉलवर रोखण्यात आली. पण नागरिकांनी दगडफेक करत पाठलाग सुरूच ठेवला. यानंतर लपलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून नागरिकांनी बेदम चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. शहर पोलिसांनी दोघां चोरट्यांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : रावणाच्या ऐवजी श्रीरामांचा पुतळा जाळला; कुठे घडला धक्कादायक प्रकार? पाहा व्हिडिओ

Green Coffee: वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफीचे सेवन योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Manoj Jarange: मराठा आरक्षण ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; मनोज जरांगे नेमकं काय काय म्हणाले? EXCLUSIVE VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २३ हजार मतदार बोगस मतदार

Indian Army Chief : यावेळी तुम्हाला नकाशावरून गायब करु, भारताच्या लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

SCROLL FOR NEXT