Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : सांगली हादरले! पाठलाग करत भररस्त्यात केली हत्या; मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार

Ssangli News : काही दिवसांपूर्वी वाल्मिकी आवास मधल्या तरुणांसोबत घोडागाडी पळवण्याच्या कारणातून वाद झाला होता. या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला

विजय पाटील

सांगली : सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोड वरील वाल्मिकी आवासमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत धारदार हत्याराने डोक्यावर, गेल्यावर आणि हातावर वार करून निर्घृण खून केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सांगलीतील वाल्मिक आवास येथील रहिवासी असलेला सौरभ बापू कांबळे (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान सौरभ याचा काही दिवसांपूर्वी वाल्मिकी आवास मधल्या तरुणांसोबत घोडागाडी पळवण्याच्या कारणातून वाद झाला होता. या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात दिवसाआड होणाऱ्या खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून तपास सुरु 

सौरभ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर त्याचा भाऊ देखील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या तो कळंबा कारागृहात आहे. तर हत्येच्या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास करत मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. 

बागांमधून डाळींब चोरी 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरामध्ये सध्या डाळिंब चोऱ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरटे बागांमधून तयार झालेले डाळिंब वाहनांमध्ये भरून पसार होत आहेत. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास चोरटे डल्ला मारीत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. परिसरातील तीन शेतकऱ्यांचा मिळून साधारणपणे १२ लाख रुपयांचा डाळिंब शेतीमाल चोरून अज्ञात चोरटे पसार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा तब्बल 'इतक्या' रुपयांनी घटले भाव; पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

Maharashtra News Live Update: चांदोली धरण परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार, बोगस पदवीने मिळवली सरकारी नोकरी, असं उघड पडलं पितळ

Viral News : अजब लग्नाची गजब गोष्ट! एकत्र राहण्यासाठी ३ सख्ख्या बहिणींनी एकाच नवरदेवाशी केला विवाह

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा 7 विकेट्सने केला पराभव

SCROLL FOR NEXT