Sangli Crime x
महाराष्ट्र

दारू पिण्यावरून वाद, मित्रांनीच मित्राला संपवलं; दगडानं ठेचून-ठेचून...; सांगलीत रक्तरंजित थरार

Sangli Crime : सांगलीच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

  • सांगलीत मित्रांनीच मित्राचा केला खून

  • दारू पिण्यावरुन मित्रांमध्ये झाला होता वाद

  • दगडाने ठेचून तरुणाला संपवलं

Sangli Crime News : सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दगडाने ठेचून तरुणाला संपवण्यात आले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. या हत्येच्या घटनेमुळे सांगलीच्या संजयनगर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या एका औद्योगिक वसाहतीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाचे नाव रोहित आवळे (वय २२ वर्षे) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दारू पिण्याच्या वादातून रात्रीच्या सुमारास तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी दगडाने ठेचून रोहितचा जीव घेतला. हे हल्लेखोर त्याचेच मित्र असल्याचे सांगितले जात आहे.

दारू पित असताना रोहित आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून रात्रीच्या सुमारास मित्रांनी रोहितवर हल्ला केला, दगडाने ठेचून रोहितची निर्घृणपणे हत्या करण्यात आली अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

सांगलीत एका तरुणाचा दगडाने ठेचून मारण्यात आले. हा तरुण मित्रांसह दारू पित होता, दारू पिण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. मित्रांनी त्याच्यावर हल्ला केला. दगडाने ठेचून या तरुणाला संपवण्यात आले. तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

Bigg Boss 19: धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाला, 'उद्या त्यांचा वाढदिवस आणि...'

SCROLL FOR NEXT