Crime News सांगली : काेल्हापूर रस्त्यावरील हाॅटेल महाराजाचे कुलूप ताेडून तब्बल ८१ हजार रुपयांचे साहित्य चाेरणा-या दाेघांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. दाेन्ही संशयित आराेपींना काळवीट येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात चाे-यांचे प्रमाण वाढल्याने गुन्हे राेखण्यासाठी पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास (एलसीबी) उपाययाेजना करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या हाेत्या. त्यानूसार एलसीबीने एक पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून गुन्हे उघडकीस येण्यास मदत हाेऊ लागली आहे.
या पथकाने चार दिवसांपुर्वी झालेल्या एका माेठ्या चाेरीचा तपास करुन दाेघांना काळवीट येथे सापळा रचून ताब्यात घेतले. दाेघांकडून सुमारे ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात एलसीडी दूरचित्रवाणी, संगणकाचा मॉनिटर, सीसीटीव्ही कॅमेरे आदी साहित्य आहे. या संशयितांकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.