Girl Physically Abused In Sangli Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime: शौचालयात नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, सांगलीतील खळबळजनक घटना

Girl Physically Abused In Sangli: सांगलीमध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागरिकांनी तरुणाला पकडून चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेप्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमध्ये ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले.शहरातल्या संजयनगर परिसरात ही घटना घडली. मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने सार्वजनिक शौचालयात नेऊन ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. आरोपी तरुण पीडित मुलीच्या शेजारी राहतो.

दरम्यान ही घटना समोर येताच नागरिकांनी संशयित तरुणास बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ज्या ठिकाणी ही अत्याचाराची घटना घडली. त्या सार्वजनिक शौचालयाची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. दरम्यान आरोपीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांकडून रस्तारोको आंदोलन देखील करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT