Vishal Patil  Saam tv
महाराष्ट्र

Vishal Patil : सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार; पक्षातील वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर विशाल पाटील यांचं जनतेला पत्र

Vishal Patil On Sangli lok sabha constituency : सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीतील जनतेला पत्र लिहिलं आहे. 'सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार, असा दावा देखील विशाल पाटील यांनी पत्रातून केला आहे.

Vishal Gangurde

Vishal Patil wrote letter to Sangli lok sabha :

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे, तर ठाकरे गटाने उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठांशी भेट घेतली. या भेटीत मैत्रीपूर्ण लढतीविषयी देखील चर्चा केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आता सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीतील जनतेला पत्र लिहिलं आहे. 'सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार, असा दावा देखील विशाल पाटील यांनी पत्रातून केला आहे.

विशाल पाटील यांनी सांगलीच्या जनतेला लिहिलेलं पत्र जसेच्या तसे

मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.

वसंतदादा पाटील, पतंगराव कदम साहेब, गुलाबराव पाटील साहेब, प्रकाशबापू पाटील, मदनभाऊ पाटील, आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

Stomach cancer: महिलांमध्ये लपलेली असतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

Pune Politics: मुरलीधर मोहोळ यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार नेमकी कुणाची? रवींद्र धंगेकरांनी नव्या पोस्टद्वारे फोडला बॉम्ब

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT