SANGLI ST BUS ACCIDENT: 2-3 KILLED, 15-20 INJURED IN RENAVI GHAT COLLISION saam tv
महाराष्ट्र

सांगलीत एसटी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 3 प्रवाशांचा जागेवर मृत्यू; 15 ते 20 जखमी

Sangli Bus Accident: सांगलीच्या खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

  • सांगलीच्या रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक

  • रेणावी घाटातील भीषण बस अपघातात 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

  • सांगली खानापूर तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात

विजय पाटील, साम प्रतिनिधी

सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या रेणावी येथे 2 एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन ते तीन जण ठार झाले असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेणावी येथील घाटामध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. विटावून घेऊ घाटला जाणारी आणि विजापूरहून मेढा या ठिकाणी जाणाऱ्या बसचा समोरासमोर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यामधील काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विट्याहून आटपाडी घाटाच्या दिशेने जाणारी एसटी बस विजापूरहून मेढा (जि. सातारा) कडे जाणारी एसटी बसला धडकलीय. रेणावी घाटातील तीव्र वळणावर या बसेसचा अपघात झाला. घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने दोन्ही बसेसची अत्यंत जोरात धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दोन्ही बसेसच्या पुढच्या भागाचा पुरता चक्काचूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Bus Accident : भीषण अपघात! एसटी बस अन् ट्रकची जोरदार धडक; ४५ विद्यार्थी जखमी, ६ जण गंभीर

Singer Death: प्रसिद्ध गायकाचा वयाच्या ३५व्या वर्षी मृत्यू ; घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shocking : धक्कादायक! महाराष्ट्राच्या कुस्तीपटूने आपल्या ३ मुलांसह आयुष्याचा दोर कापला; कारण समोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला, ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT