Sangli Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Sangli Accident News: पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! भरतीच्या सरावासाठी जाताना भीषण अपघात; १ जागीच ठार, ३ जखमी

Sangli Breaking News: पोलीस भरती सरावासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला झाला असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

विजय पाटील

Sangli Accident News:

सांगलीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पोलीस भरती सरावासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला झाला असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकल वरून पहाटेच्या सुमारास दोन दुचाकींवरुन चार तरुण भोसे मधून सांगली ( Sangli) क्रीडा संकुल येथे येत होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबीजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

शिरीष अमसिद्ध खंबाळे (वय 21, रा. भोसे) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्वजीत विजय मोहिते (वय 24, रा. भोसे) प्रथमेश उत्तम हराळे (वय 24, रा. भोसे), प्रज्वल साळुंखे (वय, 24 रा. कसबे डिग्रज) अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलिस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून प्रज्वल साळुंखे याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते. शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामध्ये ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT