सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदारांवर सुरू केली कारवाई Google
महाराष्ट्र

Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ६० जणांवर जप्तीची कारवाई

Central Bank Action: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एनपीए कमी करण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. घरबांधणी, व्यवसाय, आणि शेती कर्ज थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कोट्यावधी रुपयांची थकबाकी असलेल्या ६० कर्जदारांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मार्च एंड जवळ येत असल्याने आणि एनपीए कमी करण्याच्या उद्देशाने बँकेकडून ही विशेष मोहिम राबवली जात आहे.

यामध्ये, घरबांधणी, व्यवसाय, शेती कर्ज अशा प्रकारच्या मुदतीच्या कर्जाचे हफ्ते थकल्याने ६० कर्जदारांना ८ कोटी ३५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे.

कोणावर होणार कारवाई?

या यादीत काही माजी बँक कर्मचारी, सहकारी संस्था, उद्योजक आणि व्यावसायिक यांचा समावेश आहे. शेती कर्जाची नियमित वसुली केली जात असली तरी बिगरशेती कारणांसाठी दिलेले कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहे. बँकेने घर बांधण्यासाठी व इतर कारणांसाठी वैयक्तिक कर्ज दिले होते.

तब्बल ८ कोटी ३५ लाख रुपये थकीत आहेत, त्यामुळे बँकेने थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे. जर मुदतीत त्यांनी थकबाकी भरली नाही, तर सरफेसी कायद्यांतर्गत त्यांच्या मालमत्तेची विक्री करून वसुली करण्यात येणार आहे. बँकेचा हा आक्रमक पवित्रा पाहता थकबाकीदारांसाठी मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT