Sangli News Saam TV
महाराष्ट्र

भरवस्तीमधील घरात सापडली जनावरांची ५३ शिर; पोलिसांच्या छाप्यात समोर आली धक्कादायक माहिती

पोलिसांच्या छाप्यात ५० किलो मांस, वासराची ६ आणि रेडकांची आठ अशी लहान जनावरांची एकूण 53 शिर सापडली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यातील आष्टा येथील साठेनगरमध्ये भरवस्तीमधील एका घरात सुरु असलेल्या जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर शुक्रवारी रात्री आष्टा पोलिसांनी (Ashta Police) गोरक्षकांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून ५०० किलो मांस आणि लहान जनावरांची ५३ शिर , रक्त कातडी अन्य अवयव आणि हत्यारे जप्त केली आहेत.

साठेनगरमध्ये जनावरांचा बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याची माहिती प्राणी कल्याण अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या कत्तलखान्यावर शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी या ठिकाणी संशयित सुधीर घस्ते यांच्या घरात हातात सत्तूर व सुरेख घेऊन जनावरांचे मास तोडत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तसंच त्यांच्याकडील जनावरांचे ५०० किलो मांस, वासराची सहा आणि रेडकांची आठ अशी लहान जनावरांची एकूण ५३ शिर चमडे जनावरे कापण्याचे हत्यारे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या संशयता विरोधात महाराष्ट्र प्राणी अधिनियम गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकर बिझनेसमन होणार विराट कोहलीच्या RCBचा मालक, तब्बल १७५५३ कोटींच्या डीलची चर्चा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT