Sangamner News Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला; हल्लेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Sangamner News : वाळू वाहतूक करण्यावर बंदी असताना देखील रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक केली जाते. यांच्यावर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकांवर हल्ला करण्यात येत असल्याचे घटना समोर आल्या

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीपात्रातुन अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या वाळु तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसुलच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर जेसीबी घालून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हल्ला करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

वाळू माफियांची मुजोरी वारंवार समोर आली आहे. वाळू वाहतूक करण्यावर बंदी असताना देखील रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असते. यांच्यावर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकांवर हल्ला करण्यात येत असल्याचे घटना समोर आल्या आहेत. अर्थात प्रशासनावर वाळू माफियांची मुजोरी कायम पाहण्यास मिळते. असाच प्रकार अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात घडली होती. महसूल प्रशासनावर हल्ला करण्यात आला होता. 

दोनजण ताब्यात, आठ जणांचा शोध सुरु  

दरम्यान महसूल पथकावर हल्ला करण्यात आल्यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास करत विशाल खेमनर आणि सागर जगताप या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी आणखी आठ सहकाऱ्यांची नावे सांगितली असुन पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

व्हिडीओ आला समोर 

प्रवरा नदीमधून वाळू उपसा केला जात असताना महसूल विभागाच्या पथक दाखल झाले होते. यावेळी महसूल पथक जेसिबीचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. जेसीबी महसूल पथकाच्या हाती लागू नये, यासाठी वाळू तस्करांकडून कार आणि दुचाकी आडवी घालून पथकाला अडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : गर्दीपासून दूर असलेला मुंबईचा ऐतिहासिक खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हा' किल्ला

वांगणीत चाळ माफियांना दणका; 100 हून अधिक अनधिकृत घरांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

SCROLL FOR NEXT