Ranjit Deshmukh Mahananda Saam tv
महाराष्ट्र

Ranjit Deshmukh News : महानंदाचे खाजगीकरण होण्यापेक्षा NDDB कडे हस्तांतरण योग्य; रणजित देशमुख

Sangamner News : राज्यातील दुध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या महानंदावरून मोठ राजकारण तापलय. महानंदा गुजरातला जाणार असा आरोप देखील होत आहे.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : महानंद दूध संघ NDDB कडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला विरोधकांकडून विरोध होत आहे. अशात (Congress) काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि महानंदचे माजी चेअरमन रणजीत देशमुख यांनी मात्र या निर्णयाच समर्थन करत खासगीकरणापेक्षा (Sangamner) एनडीडीबीकडे हस्तांतरण चांगले असल्याचे रणजित देशमुख यांनी म्हटले आहे. (Breaking Marathi News)

राज्यातील दुध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या महानंदावरून मोठ राजकारण तापलय. महानंदा गुजरातला (Gujrat) जाणार असा आरोप देखील होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेला हा दूध संघ एनडीडीबीकडे द्यावा असा प्रस्ताव महानंदच्या संचालक मंडळाने राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातकडे पळवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप विरोधकांनी करत या निर्णयाला विरोध सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोध सुरू असतानाच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि महानंदाचे माजी चेअरमन रणजीत देशमुख यांनी मात्र या निर्णयाच समर्थन केले आहे. एनडीडीबी नेमक कधी स्थापन झालं ? त्याचे नेमके कार्य काय? हे समजून घेणे गरजेचे असल्याच देशमुख म्हणत आहेत. त्यांनी जळगाव दूध संघाचे उदाहरण समोर ठेवत काही वर्षांपूर्वी (Jalgaon) जळगाव दूध संघ देखील तोट्यात असताना त्यांच्याकडे हस्तांतरित केला होता आणि तो पुन्हा नफ्यात आल्यावर तो जळगाव दूध संघाकडे परत देण्यात आला. त्यामुळे महानंदाचे खाजगीकरण होण्यापेक्षा हस्तांतरण करणे गरजेचे असल्याच सुद्धा देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT