सांगली : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेकडून सांगली जिल्ह्यातील ७०० सेविकांना नोटिसा बजावल्या (Sangli) आहेत. या कारवाईनंतर १७० अंगणवाड्या चालू झाल्या आहेत. (Zilha Parishad) जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारवाईमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या सेविकांनी संपातून माघारी घेऊन अंगणवाड्या चालू केल्या आहेत. (Tajya Batmya)
सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी ४ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील दोन हजार ६४७ सेविका आणि दोन हजार ६४७ मदतनीस असे एकूण चार हजार ८९८ कर्मचारी संपावर आहेत. या संपामुळे ६२ हजार बालके आणि गरोदर मातांच्या आहाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून शासनाने (Anganwadi Workers) अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर कारवाई करून अंगणवाड्या चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ७०० सेविकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील १७० सेविका व मदतनीसांनी अंगणवाड्यांचे कामकाज चालू केले आहे, तसेच जवळपास ३०० अंगणवाड्यांचे कामकाज चालू होईल; असा विश्वासही जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.