Sangali Crime News in Marathi, Tukaram Mote News Saam Tv
महाराष्ट्र

Sangali Crime : गुंड तुकाराम मोटेचा सांगलीत खून; चाकूने सपासप केले वार

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून झाला आहे

विजय पाटील

सांगली : सांगली (Sangali) शहरातील संजयनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुंडाचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुकाराम सुभाष मोटे (वय 27) असं मृत झालेल्या गुंडाचं नाव आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून झाला आहे. किरकोळ वादातून तुकाराम याचा चाकूने भोसकून खून झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी (Police) दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे. (Sangali Crime News in Marathi)

मृत तुकाराम मोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. काही महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोलपंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून त्याने महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करुन मारहाण केली होती. इतकंच नाही तर, महिला कर्मचाऱ्याच्या हातातील पैसेही त्याने हिसकाण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण प्रकार समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता.

दरम्यान, संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातून हाणामारी झाली. या हाणामारीत तुकारामला चाकूने भोसकण्यात आले. तीन ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळे तुकाराम मृत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे. तुकाराम याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास संजयनगर पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT