MNS SHIVSENA Saam
महाराष्ट्र

MNS-Shivsena: '..मग उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का?' ठाकरे बंधूंच्या युतीवर संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

MNS Leaders Express Concerns Over Possible Alliance Between Raj and Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक, पॉडकास्टमधील संदेश आणि त्यावरील प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या.

Bhagyashree Kamble

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक, पॉडकास्टमधील संदेश आणि त्यावरील प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, मनसे नेत्यांमध्ये संभाव्य युतीबाबत काहीसे नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच संपूर्ण मराठी माणसांनी एकत्र यायला हवे. फक्त ठाकरे बंधूच का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

केवळ ठाकरे बंधू एकत्र येऊन चालणार नाही

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रया देताना म्हटलं की, 'मराठी भाषा, हिंदी सक्ती, महाराष्ट्राचा अपमान, मराठी भाषेची गळचेपी, नद्या प्रदुषण, रोजगारामध्ये इतर राज्यातील लोकांना प्राधान्य, खरंतर अशा अनेक मुद्द्यावर मराठी माणसांनी आणि पक्षांनी एकत्र यायला हवे, केवळ ठाकरे बंधू एकत्र येऊन चालणार नाही', असं संदीप देशपांडे म्हणालेत.

निवडणुकीचा विचार नंतर करू, आधी मराठी माणासाचा विचार करा

देशपांडे म्हणाले, 'खरंतर फक्त निवडणुकीपुरती एकजूट नको. आज निवडणुका नाहीत, पण हिंदी सक्तीचा प्रश्न आहे. यूपी बिहारमधून उत्तीर्ण झालेले अधिकारी महाराष्ट्रात पोस्टिंग घेत आहेत. हे थांबवण्यासाठी एकजूट हवीय.

तामिळनाडूमध्ये जसं सर्व पक्ष कावेरीच्या मुद्यावर एकत्र येतात, तसं आपणही मराठी माणसाठी एकत्र आले पाहिजे', असं संदीप देशपांडे म्हणालेत.

उद्धव ठाकरे माफी मागणार का?

'महाराष्ट्र - महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचं काम शिवसैनिकांचे नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भोंग्याच्या आंदोलनावेळी त्यांनी मनसैनिकांवर १७ हजार केसेस टाकल्या होत्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांटी माफी मागणार का?' असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT