संजय राऊतांनी आनंद दिघेचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीने लावल्यावर आक्षेप घेतला.
संजय राऊत म्हणाले, 'आनंद दिघे फक्त जिल्हाप्रमुख होते, नेते किंवा उपनेते नव्हते'
राऊत यांनी एकनाथ शिंदे व भाजपवर बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा आरोप केला.
Sanjay Raut Statement : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्याशेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने आनंद दिघे यांचा फोटो लावण्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत बोलत होते.
बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आनंद दिघे यांचा फोटो लावल्याने संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते. ते फक्त जिल्हाध्यक्ष होते. दिघे यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
'बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता. हे कोणती नवीन पद्धत आहे. आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते. ते शिवसेनेचे नेते नव्हते, ते उपनेतेही नव्हते. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. हा एक राष्ट्रीय कट आहे. बाळासाहेबांच्या बाजूला तुम्ही अजून एक फोटो लावला', असे संजय राऊत म्हणाले.
'बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते. आनंद दिघे हे शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते. तुम्ही जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने बसवून काय दाखवताय? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना? की बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व अजून कमी करा असा त्यांचाचा हा आदेश आहे?' असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.