Sana Khan Case Updates Police demand narco test of accused Amit Sahu in Nagpur court
Sana Khan Case Updates Police demand narco test of accused Amit Sahu in Nagpur court Saam TV
महाराष्ट्र

Sana Khan Case: हत्येच्या 26 दिवसानंतरही सना खानचा मृतदेह सापडेना, आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल; आता पुढे काय?

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Sana Khan Murder Case Updates: नागपूर भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान यांची मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये हत्या करण्यात आली. सना खानचा पती तसेच तिचा व्यावसायिक पाटर्नर अमित साहू याने ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आरोपी तपासात दिशाभूल करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. आरोपी अमित साहू सतत वक्तव्ये बदलून पोलिसांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी नागपूर न्यायालयाकडे केली आहे. तसा अर्ज देखील पोलिसांनी कोर्टात दिला आहे.

आज या अर्जावर सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देणार? याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे. सना खान बेपत्ता होऊन तब्बल 26 दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, पोलिसांनी (Police) अजूनही सना खानचा मृतदेह सापडला नाही. जर मृतदेह सापडला नाही, तर आरोपीची सुटका होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सना खान हत्या प्रकरण, नेमकी घटना काय?

प्राप्त माहितीनुसार, अमित आणि सना खान यांचे लग्न झाले होते. ते दोघे बिझनेस पार्टनर देखील होते. अमितच्या जबलपूर येथील 'आशीर्वाद' नावाच्या ढाब्यात सनाने पैसे गुंतवले होते. तसेच सोन्याचे दागिने देखील अमितला तिने गिफ्ट केले होते. दागिने अमितने विकल्याचा संशय सना खानला आला होता. त्यामुळे जबलपूरला पोहोचून पैशाचा व्यवहार आणि दागिन्यांविषयी विचारणा केल्यावर दोघांमध्ये मोठे भांडण झाले.

या भांडणात रागाच्या भरात अमितने लोखंडी रॉड (Crime News) सनाच्या डोक्यावर मारून तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह दिवसभर घरात ठेवला. दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास अमित त्याच्या घरी पोहोचला. त्याने सनाचा मृतदेह कारमध्ये ठेवून त्याच्या ढाब्याच्या मागे असलेल्या हिरण नदीत फेकून दिला. मृतदेह नदीत फेकल्यावर कार धुण्यासाठी ढाब्यावरील नोकराला दिली.

त्यावेळी कारच्या डिक्कीत रक्त होते. कार स्वच्छ केल्यावर नोकर त्याच्या गावी निघून गेला आणि अमित तिथून कारसह फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. खूनामागे केवळ पैशाचा वाद आहे, की आणखी काही कारण याचा, तपास पोलिसांना करायचा आहे, शिवाय सनाचा मृतदेह शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT